पोलिसांनी घेतली बैठक : एकाच पालखीला दिली परवानगी
प्रतिनिधी /बेळगाव
सीमोल्लंघन कार्यक्रमामध्ये केवळ एकाच पालखीला सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवार दि. 15 रोजी दुपारी 2 वाजता मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार असून मोजक्मयाच व्यक्तींनी त्या ठिकाणी उपस्थित रहावे, अशी सूचना मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी केली.
मार्केट पोलीस स्थानकाच्या एसीपी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यापूर्वी सर्व पालख्यांना तसेच हा सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र राज्य सरकारच्या आदेशानुसार मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडावा, असे सांगण्यात आले.
चव्हाट गल्ली येथील देवदादा सासन काठीची पालखी निघणार आहे. मात्र इतर मंदिरांच्या पालखी मागील वषीप्रमाणे मंदिरांच्या प्रदक्षिणा घालून तेथेच पूजाअर्चा करावी, असे सांगण्यात आले आहे. शहर देवस्थान कमिटी आणि चव्हाट गल्ली देवदादा सासनकाठी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होईल.
या बैठकीला खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांच्यासह सुनील जाधव, लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, राजकुमार खटावकर आदी उपस्थित,होते.