पेडणे बाबूने विकायला काढले : प्रवीण आर्लेकर,लीज करार रद्द करण्याची मागणी
प्रतिनिधी /पेडणे
पेडणेतील गोरगरीब शेतकऱयांच्या जमिनी अल्प किंमतीत सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनी आता खाजगी मोपा विमानतळ बांधकाम करणाऱया जीएमआला कंपनीच्या घशात घालण्याचे काम पेडणे मतदारासंघाचे आमदार तथा गोवा राज्याचे उपमुख्यमंञी बाबू आजगावकर करत असून धारगळ येथे घेण्यात आलेली गृहनिर्माण वसाहत उभारण्यासाठी सरकारने घेतलेली सुमारे 1 .68 लाख चौरस मीटर जमिन ही मोपा विमानतळ बांधकाम कंपनी जीएमआरला 60 वर्षांच्या करारावर देण्यासाठी करार करण्यात आला असून यात पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावकर गुंतले असून मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत यात विशेष लक्ष घालून ही जमीन वाचवावी व गृहनिर्माण वसाहत उभारण्याची जमीन तशीच ठेवावी नाहीतर मगो पक्ष लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी दिला.
दोनखांब धारगळ येथे सरकारने काही वर्षापूर्वी सरकारी वसाहत उभारण्यासाठी सुमारे 1.68 लाख जागा घेतली होती. ही जागा खाजगी कंपनीला देण्याचा घातलेला घाट कळल्यावर त्या ठिकाणी जाऊन पेडणे मगो नेते प्रवीण आर्लेकर तसेच मगोचे पेडणे मतदारसंघाने अध्यक्ष उमेश तळवणेकर , माजी आमदार परशुराम कोटकर , केंद्रीय समितीचे सदस्य सुदिप कोरगावकर , धारगळचे माजी राजन म्हापसेकर , देवानंद गावडे, महेश परब, जयेश पालयेकर , सुनील शेटय़? आदीनी पहाणी केल्यानंतर ते पञकारांकडे बोलत होते.
बाबूने पेडणे विकायला काढलेः प्रवीण आर्लेकर
प्रवीण आर्लेकर बोलताना पुढे म्हणाले की बाबू आजगावकर यांनी पेडणे विकायला काढण्याचा घाट घातला असून शेतकऱयांच्या जमिनी कवडीमोल किंमतीत मोपा विमानतळ प्रकल्पासाठी 90 लाख चौरस घेऊन शेतकऱयांवर अन्याय केला आहे.जगात कुठेच अशा प्रकारे विमानतळासाठी जमिन संपादित केली नाही.30 ते40 लाख चौरस मीटरजमिन विमानतळासाठी पुरशी असताना खाजगी कंपन्यांनाही जमीन देण्याचे काम बाबू आजगावकर यांनी केले.आता ते धारगळला पोचले असून धारगळ येथील गृहनिर्माण वसाहत उभारण्यासाठी सुमारे 1.68 लाख चौरस मिटर जमीन ही आता जीएकआर कंपनीला देण्यासाठी 60 वर्षाचा करार झाला आहे. जीएमआर कंपनी आणि बाबू आजगावाकर हे पेडणे विकायला काढत असल्याचा आरोप प्रवीण आर्लेकर यांनी केला.
बाबू आजगावकर यांनी शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसलीः उमेश तळवणेकर
यावेळी बोलताना पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे मंडळ अध्यक्ष उमेश तळवणेकर म्हणाले, मोपा विमानतळ प्रकल्प, क्रीडा नगरीसाठी मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांच्या जमिनी सरकारने घेतल्या. गरज नसाताना कवडीमोल किंमतीत त्या जमिनी घेतल्या .आणि खाजगी कंपन्यांच्या खशात घातल्या.त्यांना 25 हजार रुपये किंमतीला ते कमिशन खाण्यासाठी विकल्या.आणि शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसली. क्रीडा नगरीच्या जमिनीत आयुष इस्पितळ उभारला.आणि आता धारगळ येथील सरकारी जागेत गृहनिर्माण वस्ती उभारण्यासाठी घेतलेली जागा ही जीएमआर कंपनीला दिली.यातबाबूला कमिशन असून रविंद्रा भवन व गृहनिर्माणृ वसाहतीच्या जागेबाबत सरकारने झालेला करार रद्द करावा नाहीतर मगो पक्ष आंदोलन करणार असा इशारा उमेश तळवणेकर यांनी दिला.
यावेळी माजी आमदार परशुराम कोटकर यांनी बाबूने जमिनीबाबत पेडणेतील शेतकऱयांना जो ञास दिला त्याचा बदला येत्या विधानसभा निवडणुकीत जनता घेणार असल्याचे सांगितले .
सरकारने गृहनिर्माण वसाहतीची जागेचा लीज रद्द करावाः माजी सरपंच राजन म्हापसेकर
यावेळी बोलताना धारगळचे माजी सरपंच राजन कोरगावकर म्हणाले धारगळ येथे जमिनदारांनी सरकारला गृहनिर्माण वसाहत उभारण्यासाठी जागा दिली होती.ती सरकार व स्थानिक आमदार बाबू आजगावकर खाजगी कंपनीला देत असून धारागळ गावता सार्वजनिक स्मशानभूमी नाही ती उभारण्याची आम्ही मागणी केली होती.याठिकाणी रविंद्र भवन झाले असते तर कलाकारांना एक व्यासपीठ मिळाले असते माञ तसे न करतात सरकारने ही जागा अत्यंत कवडी मोल किंमतीने घेतली होती ती लीज रद्द करुन परत करावी अशी मागणी केली. यावेळी सुदीप कोरगावकर यानीही लीज रद्द करावाअशी मागणी केली.