प्रतिनिधी /बेळगाव
इपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) ने जून महिन्यापासून काही बदल केले आहेत. प्रत्येक पीएफ धारकाने आपला यूएएन क्रमांकाला आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. यापुढे ज्यांचा आधार क्रमांक लिंक असणार नाही त्यांचे पीएफसाठीचे निधी संकलन बंद राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱयाने आधार लिंक केला आहे का याची पडताळणी करावी, अशी माहिती विभागीय पीएफ आयुक्त मिहीरकुमार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
बेळगाव जिल्हय़ात पीएफधारकांची मोठी संख्या आहे. परंतु अद्याप अनेक कामगारांनी आपल्या यूएएन क्रमांकाला आधार क्रमांक लिंक केलेला नाही. यापूर्वीही इपीएफओने आधार नोंदणीसाठी कर्मचाऱयांना वेळ दिली होती. परंतु अद्यापही काहींनी लिंक न केल्याने त्यांचे निधीसंकलन थांबविण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक कामगाराने आधार लिंक केले आहे का, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.