वृत्तसंस्था/ मिलान
आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झल्टान इब्राहिमोव्हिक याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती गुरुवारी ए सी मिलान फुटबॉल क्लबच्या प्रवक्त्याने दिली आहे. बुधवारी ए सी मिलानच्या फुटबॉलपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये इब्राहिमोव्हिक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
याच संघातील लिओ डय़ुरेटी यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता इब्राहिमोव्हिक आणि डय़ुरेटी यांना त्यांच्या निवासस्थानी क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मात्र, कोरोना चाचणीत ए सी मिलानचे इतर फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकवर्ग यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे आढळून आले.