44 जण झाले बरे,हुक्केरी येथील रहिवाशाचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यात बुधवारी कोरोनाचे 41 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हुक्केरी येथील 49 वषीय बाधिताचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 335 वर पोहोचला आहे. तर एकूण बाधितांचा आकडा 24 हजार 819 वर पोहोचला आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरांतील 11 व ग्रामीण भागातील 5 असे बेळगाव तालुक्यातील 16 जणांचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. जिह्यातील 44 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले असून आतापर्यंत 23 हजार 971 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या 513 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाला आणखी 1718 अहवालांची प्रतिक्षा आहे. जिह्यात अद्याप 25 हजार 494 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
अतिवाड, बेळगुंदी, गणेशपूर, खणगाव, भाग्यनगर, कावळेवाडी, नावलगट्टी, न्युगुडस् शेड रोड, सह्याद्रीनगर, विरभद्रनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बिम्स्मधील दोन विद्यार्थिनींनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिह्यातील 2 लाख 27 हजार 714 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 1 लाख 99 हजार 819 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.