हरमल वार्ताहर :
मांदे श्री भगवती मंदिरानजीक तसेच मांदेचे आमदार दयानंद सोपटे यांच्या कार्यालयानजीक असलेल्या संजय मांदेकर यांच्या मंगेश स्टोअर्सला आग लागून भस्मसात झाले.अंदाजे आठ लाखाचे नुकसान झाल्याची शक्मयता आहे.
काल 15 रोजी पहाटे 3 च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडल्याचे मालक संजय मांदेकर यांनी सांगितले.सकाळी 9 पर्यत धूर धुमसत होता.घराला लागून असलेल्या ह्या स्टोअर्सच्या इमारतीतच्या छताचा पीओपी भाग, स्टेशनरी व गिफ्ट आयटम तसेच दुग्धजन्य,आईस्क्रीम आदीसाठी तीन रेफ्रिजरेटर होते.त्यापैकी एक रेफ्रिजरेटर अलीकडे दुरुस्तीनंतर चालू केला होता व त्यात बिघाड झाल्याची शक्मयता त्यानी व्यक्त केली.पहाटे ग्लासच्या किमती वस्तू फुटण्याच्या आवाजाने जाग आली व पूर्ण घरात धूर जमा झाला होता.पाहतो तो आगीचा लोळ उठला होता.पेडणे व म्हापसा अग्निशमन दलाचे बंब चार वाजता पोचले व आग आटोक्मयात आणली.मात्र स्टोअर्समधील सर्व माल भक्ष्यस्थानी पडला होता.दुकानाच्या शो केसेस,रॅकस व लाकडी साहित्य जळून खाक झाले होते,असे मालक मांदे कर यांनी सांगितले.
दरम्यान,मांदे मतदारसंघासाठी स्वतंत्र अग्निशमन दल स्थापन करण्याची मागणी व्यावसायिक व नागरिकांतून केली जात आहे.जेव्हा आगीच्या घटना घडतात,त्यावेळेस किमान तासाभराने अग्निशमन दलाचा बंब व जवान पोचत असतात.खरे म्हणजे,एक तासाचा अवधी बराच फरक असतो व होत्याचे नव्हते बनते अशी प्रतिक्रिया नागरिक मधु मांदेकर यांनी दिली.मांदे मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार दयानंद सोपटे यांनी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी ह्या घटनेनंतर नागरिकांनी व्यक्त केली.