क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा क्रिकेट संघटनेने 16 व 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंची निवड करण्यासाठी खुल्या चाचणीचे आयोजन केले आहे. त्यासाठी इच्छुक क्रिकेटपटूंनी रजिस्ट्रेशन फॉर्म जीसीएच्या www.goacricketassociation.co.in वेबसाईटवरून डाऊनलोड करावे आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडवर भरून दय़ावेत. आजपासून या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
याशिवाय फॉर्म्स गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरीस्थित कचेरीतही उपलब्ध असून ते कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. 16 वर्षांखालील क्रिकेटपटू 1 सप्टेंबर 2006 ते 1 सप्टेंबर 2008 तर 19 वर्षांखालील क्रिकेटपटू 1 सप्टेंबर 2003 व त्यानंतर जन्मलेले असावेत. 16 वर्षांखालील क्रिकेटपटू 14 वर्षांवरील आणि 16 वर्षांखालील तर 19 वर्षांखालील क्रिकेटपटू 16 वर्षांवरील ते 19 वर्षांखालील असावेत. अधिक माहितीसाठी जीसीएत (8459770418) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. केवळ स्थानिक क्रिकेटपटूंनाच या चाचणीत भाग घेण्यासाठी पात्र असून फॉर्म्स 11 एप्रिलपूर्वी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच स्वीकारण्यात येतील.