प्रतिनिधी/ म्हापसा
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लि.ने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या स्फूर्तीगीत गायन स्पर्धेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दि. 18 रोजी रेड रोजरी हायस्कूल कुजिरा-बांबोळी येथे तिसरी स्पर्धा संपन्न झाली. रेड रोजरीच्या मुख्याध्यापिका ऍलिस जॉन गोम्स यांनी लोकमान्यच्या या स्पर्धेबद्दल कौतुकासपद काढले. देशातील तरुणाईला राष्ट्रहिताचे महत्त्व सांगणारी स्पर्धा व अशा तऱहेचे कार्यक्रम ज्या ज्या वेळी सोसायटी करेल त्या त्या वेळी आपल्या संस्थेचे सहकार्य निश्चितच लाभेल असे भावपूर्ण उद्गार मुख्याध्यापिकेने लाढले.
या स्पर्धेमध्ये 11 शाळांचा सहभाग लाभला. एकापेक्षा एक अशा सुंदर स्फूर्तीगीतांनी स्पर्धेस रंगत आणली.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून मा. पुंडलिक कळंगुटकर व प्रेमानंद वेळुसकर यांनी काम पाहिले. डॉ. के.बी. हेडगेवार संस्थेस प्रथम पारितोषिक अवर लेडी ऑफ दिवार या संस्थेस प्राप्त झाले. शाळेच्या शिक्षिका सौ. प्रज्योती गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या मनामनामध्ये देशभक्तीची ज्योत लावणारी अशी स्पर्धा शाळा शाळातून झाली पाहिजे. लोकमान्य सोसायटीचे त्यासाठी अभिनंदन करायला हवे.
डॉ. गोविंद काळे यांनी वैभवी देश चढवीन/ सर्वस्व त्यास अर्पीण ही साने गुरुजींची कविता तरुणाईसाठी आदर्श ठरली पाहिजे. देशभक्ती ही जात- पात- धर्म- प्रांतातील संकल्पना आहे. रस्स्तव झिजणारी माणसेच देशाचे भविष्य घडवितात म्हणूनच ती वंदनीय ठरतात असे गौरवोद्गार क्रांतीकारकांच्या संदर्भात काढले. सौ. योगिता घोडगे ऍडिटर लोकमान्य सोसायटी यांनी सुंदर आणि मोजक्या शब्दात सूत्रसंचालन केले. वेळोवेळी वंदे मातरम्चा घोष सभागृहामध्ये नवादच ठेवला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पणजी मुख्य शाखेचे शाखाधिकारी अवधूत कामत यांनी केले. कार्यक्रमास कुमार प्रियोळकर, झोनल मॅनेजर अँथनी आझावेदो, असिस्टंट रिजनल मॅनेजर आणि विविध शाखांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.