ऑनलाईन टीम / श्रीनगर :
सतवारी एअरफोर्स स्टेशनवर तैनात असलेल्या एका विंग कमांडरवर महिला स्क्वॉड्रन लीडरने छेडछाडीचा आरोप केला आहे. संबंधित विंग कमांडरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप त्यांना अटक करण्यात आली नसल्याचे सतवारी पोलीस स्टेशनचे एसएचओ निशांत गुप्ता यांनी सांगितले.
तक्रारदार महिला स्क्वॉड्रन लीडरऑक्टोबर 2020 पासून जम्मू एअरफोर्स स्टेशनवर तैनात आहे. तेथील विंग कमांडरने वेगवेगळ्या पार्ट्यांना बोलावून वारंवार छेडछाड करत अश्लील चाळे केल्याचा आरोप तक्रारदार स्क्वॉड्रन लीडरने केला आहे.
त्यांचे पती नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात आहेत. त्यांना दीड वर्षांचा मुलगा असून, तिने आपल्या पतीकडे जाण्यासाठी विंग कमांडरकडून रजा मागितली. मात्र, कमांडरने रजा मंजूर केली नाही. त्यामुळे या प्रकरणीही या स्क्वॉड्रन लीडरने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.