राय येथे राज्य पातळीवरील पुरुष कलाकार भजनी स्पर्धा
प्रतिनिधी/ राय
कुण्णे -राय येथील श्री संस्थान समर्थ दत्त मंदिरने हल्लींच आयोजित केलेल्या अखिल गोवा पुरुष कलाकार भजनी स्पर्धेत उत्तर गोव्यातील नानोडा येथील श्री दाडेश्वर भजनी मंडळाला 7777 रुपयांचे रोख पारितोषीक प्राप्त झाले.
दुसरे बक्षिस कुर्टी -फोंडा येथील श्री विजयादुर्गा श्रीकृष्ण भजनी मंडळाला 5555 रुपयांचे दुसरे बक्षिस तर 3333 रुपयांचे तिसरे बक्षिस उसगाव येथील श्री आदीनाथ भजनी मंडळाला प्राप्त झाले.
2222 रुपयाचे चौथे बक्षिस बोरी येथील श्री नवदुर्गा भजनी संघ यांना तर 1111 रुपयांचे पाचवे बक्षिस आगापूर येथील श्री सिद्धारुढ भजनी मंडळाला प्राप्त झाले.
या स्पर्धेतील उत्कृष्ट गायक म्हणून आदिनाथ भजनी मंडळाचे अरुण च्यारी तर उत्कृष्ट गौळण गायक म्हणून दाडेश्वर भजनी मंडळाचे शुभम नाईक यांना प्राप्त झाले.
उत्कृष्ट हार्मोनियम साथ दिल्याबद्दल श्री नवदुर्गा भजनी संघाचे मंदार बोरकर तर उत्कृष्ट पखवाज साथ दिलयाबद्दल श्री विजयादुर्गा भजनी मंडळाचे प्रतिक देसाई यांना प्रत्येकी 1000 रुपयांचे बक्षिस प्राप्त झाले.
देवस्थानचे अध्यक्ष धिरज शेट वेरेकर, सचिव संतोष सावंत, मुखत्यार विष्णुदास शेट बांदेकर, सिद्धेश वेगुर्लेकर, सोमनाथ सतरकर यांनी पहिली पाच बक्षिसे पुरस्कृत केली होती. पहिल्या तीन विजेत्यांना अवधुत सतरकर यांनी चषक पुरस्कृत केला होता. तसेच स्पर्धेसाठी गावातील इतरांनी भरघोस आर्थिक साहाय्य केले.
स्पर्धेचे परिक्षण पेमानंद शेट वेलींगकर व धनराज दुर्गादास मडकईकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष सावंत यांनी तर आभार संदीप नायक यांनी आभार मानले.