तीन घटनांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान : अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
प्रतिनिधी/ बेळगाव
सलग दुसऱया दिवशी बेळगाव शहर व उपनगरांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या. शनिवारी सावगाव रोड, श्रीनगर व किल्ला खंदक येथे आग लागण्याच्या घटना घडल्या. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचत आग आटोक्मयात आणली.
सावगाव रोड येथील अंगडी कॉलेजनजीक एका हॉटेलला दुपारच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. यामध्ये हॉटेलमधील सर्वच साहित्य व फर्निचर जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्मयात आणत इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक होण्यापासून वाचविले.
श्रीनगर येथील अंकुर हॉस्पिटलनजीक एका इमारतीमध्ये गॅस गळतीमुळे आग लागली. यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले. या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. काही क्षणात घटनास्थळी पोहोचत अग्निशमन जवानांनी आग आटोक्मयात आणली. यामध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले आहे.
तिसरी घटना किल्ला येथील खंदक परिसरात घडली. अज्ञाताने लावलेल्या कचऱयाच्या आगीमुळे सर्वत्र आग पसरली. खंदकात टाकण्यात आलेल्या कचऱयाने पेट घेतल्यामुळे आगीचे लोळ बाहेर पडत होते. या परिसरात वाहने पार्किंग केली जात असल्याने परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचत अग्निशमन जवानांनी आग विझविली.