कमी त्रास असणाऱ्यांवर घरीच उपचार करण्यास द्यावे प्राधान्य
प्रतिनिधी / सोलापूर :
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसह इतरही रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र गेल्या महिनाभरापासून कायम आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्हा प्रशासनाने कमी त्रास असणाऱया कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवून रुग्णालयांवर पडणारा ताण कमी करणे आवश्यक आहे.
सोलापूर शहरातील सर्वच रुग्णालये ग्रामीण भागातील रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. पहिल्या लाटेत सुरक्षित असलेली गावे आज अधिक संक्रमित आहेत. सोलापुरात उस्मानाबाद, लातूर, विजयपूर या भागातील रुग्णही उपचारासाठी मोठÎा प्रमाणात येत आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच रुग्णांकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची लूट होत असल्याची तक्रारीही वारंवार समोर येत आहेत.
`लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. यासाठी लोकांनी शिस्त पाळयला हवी. पूर्वी युध्दाच्या काळात लोक अनेक दिवस घरातच असायचे. सध्या वैद्यकीयदृष्टÎा युध्दासारखीच परिस्थिती आहे. कारण नसताना घराबाहेर पडणे बंद करावे. मास्क घालणे, गर्दी जाणे टाळावे,’ असे आवाहन इंडियन मेडीकल असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्ष तथा सोलापूर प्रायवेट हॉस्पिटल ओनर असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. ज्योती चिडगुपकर यांनी केले आहे.
रिक्त असूनही बेड नाही असे सांगतात
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर शहर परिसरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी असलेल्या 2360 बेडपैकी 177 बेड रिक्त आहेत, तर आयसीयूमधील व्हेंटीलेटर सुविधा असलेले बेड उपलब्ध नाहीत. प्रशासनाकडून काही बेड रिक्त असल्याचे सांगितले जात असले तरी रुग्णालयांमध्ये मात्र बेड नाही म्हणून सांगितले जात आहे.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरी उपचार द्यावेत
सर्वच खासगी रुग्णालयातील नॉन कोविड बेड आता कोविड रुग्णांनी व्यापले आहेत. अनेक रुग्ण वेटींगवर आहेत. उपचार करण्याची इच्छा असूनही रुग्णालय प्रशासन काहीच करु शकत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयांवरचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. कमी त्रास असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवून आरोग्य प्रशासनाने लक्ष ठेवावे. घरी असणाऱया रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरीच योग्य उपचार घेवून कमी त्रास असणारे रुग्ण बरे होवू शकतात.
– डॉ. ज्योती चिडगुपकर,
अध्यक्ष, सोलापूर प्रायवेट हॉस्पिटल ओनर असोसिएशन राज्य उपाध्यक्ष, इंडियन मेडीकल असोसिएशन