प्रतिनिधी /वास्को
कलर्स मराठीच्या ‘सूर नवा, ध्यास नवा’ या सांगितिक रिऍलिटी शोमध्ये वास्कोतील नवाब शेख याने महाअंतीम फेरीत प्रवेश केला आहे. ही महाअंतीम फेरी येत्या शनिवारी व रविवारी संगीत प्रेमींना पाहायला मिळणार असून नवाब शेखमुळे गोव्यातील श्रोत्यांना या महाअंतीम फेरीची उत्सुकता आहे.
कलर्स मराठीच्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या सांगितीक रिऍलिटी शोच्या पाचव्या पर्वात झळकण्याची संधी मिळाल्यापासून नवाब शेख या उमदय़ा युवा गायकाने आपल्या गीतांनी परीक्षक आणि संगीत श्रोत्यांची मने जिंकली आहेत. त्याने अंतीम फेरीतून आता महाअंतीम फेरीही गाठलेली असून या फेरीत एकाहून एक सरस असे सात गायक कलाकार श्रोत्यांसमोर येणार आहेत. काल रविवारी रात्री सादर झालेल्या सूर नवा ध्यास नवामध्ये नवाबनेही इतर कलाकारासमवेत महाअंतीम फेरीत प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. येत्या शनिवारी व रविवारी रात्री या सात गायक कलाकारांची महाअंतीम फेरी श्रोत्यांना पाहायला मिळणार आहे.