प्रतिनिधी/ पणजी
अबॅकस, स्मार्ट किड ऍबॅकस प्रायव्हेट लिमिटेडची फ्रँचायझी ब्रेन टेन हब म्हापसातर्फे ऍबकस वेदिक गणित 12वी राष्ट्रीय आणि 5वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुणे, महाराष्ट्र येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सर्वात मोठय़ा कार्यक्रमात देशभरातील आणि बाहेरील विविध फ्रँचायझींच्या 2500 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तथापि, ब्रेन टेन हब म्हापसासुद्धा या कार्यक्रमात 22 विद्यार्थ्यांसह सहभागी झाले होते, त्यापैकी कनक परशुराम बागकर हिला तिसरे पारितोषिक व अत्रेय हरिश गवस याला पहिले उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले.
त्या स्पर्धेतील त्यांच्या संबंधित ऍबॅकस प्रकारात, त्यांना रेव्होरा शाखेच्या ब्रेन टेन हब फ्रँचायझी शिक्षिका तृप्ती सुधीर डिचोलकर यांनी प्रशिक्षण दिले. तसेच ब्रेन टेन हबला 2022 सालासाठी ऍबॅकस एज्युकेशन इंडस्ट्रीमधील उत्कृष्ट कामगिरी आणि सचोटीने विद्यार्थ्यांना सेवा दिल्याबद्दल ङसर्वोत्कृष्ट प्रेंचायझी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.