मेष
काही निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. ज्याचे परिणाम पुढे जाऊन भोगावे लागू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना सावध राहणे गरजेचे असेल. काही बाबतीत वैवाहिक जोडीदाराचा सल्ला मानावा. छोटी, मोठी कामे आरामात पूर्ण होतील. काही वेळेला अपेक्षा नसताना मदत मिळेल. सध्या हातातल्या कामांवर लक्ष केंद्रित करा.
पाच लवंगा जवळ ठेवाव्यात.
वृषभ
नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कौटुंबिक वादांना वेळीच आवर घालणे गरजेचे असेल. या आठवड्यात काही नवीन बदल होऊ शकतात, जे कामासंबंधी असू शकतील किंवा लोकांशी तुमच्याशी असलेल्या व्यवहाराशी असू शकतील. वैवाहिक जीवन समाधानकारक असेल.
पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा.
मिथुन
काही ठरलेले प्लॅन्स आयत्या वेळेला रद्द होऊ शकतात. परिवारामध्ये प्रत्येकाची मर्जी सांभाळणे अवघड जाईल. पुढच्या काळाचे आर्थिक नियोजन आत्ताच करणे गरजेचे आहे. तुमच्या आजूबाजूचे वातावरण काहीसे निगेटिव्ह असल्याने थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. वीकेंडला जुन्या मित्राची भेट होईल.
गरजूला आर्थिक मदत करावी
कर्क
गृहिणींनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक असेल. जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत करावी लागू शकते. कामासाठी दुसऱ्या ठिकाणी प्रवास घडेल. पैशांची आवक सर्वसामान्य असेल. एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. नात्यांमध्ये ऊसवा-फुगवा येऊ शकतो. व्यावसायिक संबंधांमध्ये भावनेला मध्ये येऊ देऊ नका.
दूधाचे दान द्यावे
सिंह
जर काही कामे तुम्ही बाजूला ठेवून नंतर करावी असा विचार करत असाल तर नुकसान होऊ शकते. अपेक्षा नसताना मदत मिळेल. पूर्वीच्या अनुभवामुळे खचून न जाता, नव्या उमेदीने कामे पूर्ण करावी. फायनान्स सेक्टरमध्ये काम करतात त्यांना चांगल्या संधी मिळतील.
सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घालावे.
कन्या
या आठवड्यामध्ये ध्येय प्राप्तीकरता विशेष प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल. छोटी मोठी कामे आरामात पूर्ण होतील. काही वेळेला ज्या ठिकाणी काम नक्की होईल असे वाटेल तिथे अनपेक्षित अडचण येऊ शकते. घरच्या नातेवाईकांसोबत काही काळ आनंदात घालवाल.
तुरटीने दात साफ करावेत
तूळ
सूचक स्वप्ने पडू शकतात. नवीन लोकांचा संपर्क फायदेशीर ठरेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामामध्ये हवा तेवढा उत्साह दाखवता न आल्यामुळे कामे बिघडू शकतात. परिवाराकडून हवे तसे सहकार्य मिळणार नाही. स्वभावामध्ये आक्रमकता येऊ शकते. काही निर्णय बदलावे लागू शकतात.
वस्त्रदान करा
वृश्चिक
गेल्या काही काळामध्ये ज्या अडचणींचा सामना तुम्ही केला आहे, त्यामुळे तुम्हाला एकाकीपणा वाटू शकतो. ज्यांना पैसे उधार दिले आहेत, त्यांच्याकडून परत मागताना सगळ्या प्रकारे प्रयत्न करण्याची गरज आहे. काम धंद्याच्या ठिकाणी थोडे नुकसान संभवते. मानसिक शांतता लाभावी, असेही तुम्हाला वाटेल.
कवडी जवळ ठेवावी
धनु
काही बाबतींबद्दल भ्रमनिरास होईल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्मयताही आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊन मनस्ताप होईल. या आठवड्यामध्ये तुमच्या कामाची पद्धत तुम्हाला बदलावी लागेल. अडचणींवर तुम्ही मात कराल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे घटना घडल्याने आनंद वाटेल.
लाल फूल जवळ ठेवा
मकर
या आठवड्यामध्ये अनपेक्षितरित्या आलेल्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नको त्या व्यक्तींचा सहवास लाभल्याने चिडचिड होऊ शकते. हलगर्जीपणा आणि आळस हा टाळायलाच पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने अतिरिक्त ताण येऊन तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.
अशोकाचे पान जवळ ठेवा
कुंभ
व्यवसायामध्ये प्रगतीच्या नव्या संधी प्राप्त होऊ शकतात. व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर, हा आठवडा योग्य आहे. संतती करता खर्च करावा लागू शकतो. आयत्यावेळी कोणीतरी मदतीला धावून येईल. जोडीदाराशी सुसंवाद साधल्याने बऱ्याच अडचणी दूर होतील.
धार्मिक स्थळी दुधाचे दान द्यावे
मीन
शक्यतो कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा. जामीन राहणे महागात पडू शकते. काही बदल अपरिहार्य असतील. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. कुटुंब सुख चांगले मिळेल.
निळ्या रंगाची फुले जमिनीत गाडावीत
घरात सारखी भांडणे होत असतील, घरी थांबू नये, असे वाटत असेल, नात्यांमध्ये कडूपणा आला असेल तर वाळलेल्या तुळशीची पावडर, थोडी पिवळी मोहरी, गुग्गूळ जळत्या निखाऱ्यावर घालून त्याचा धूर घरभर फिरवावा