ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने 20 हजारचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात राज्यात 1320 नव्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची संख्या 20 हजार 173 वर पोहचली आहे, अशी माहिती बिहारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल आढळलेल्या रुग्णांमध्ये आरारिया मधील 9, बेगूसराय 75, भागलपुर 125, भोजपुर 14, दरभंगा 9, पश्चिम चंपारण 21, गया 43, गोपालगंज 23, जमुई 4, जेहानाबाद 5, कैमूर 25, कटिहार 32, खगड़िया 80, किशनगंज 12, लखीसराय 10, मधेपुरा 3, मधुबनी 1, मुंगेर 32, मुजफ्फरपुर 59, नालंदा 37, नवादा 52, पाटणा 242, पूर्णिया 24, रोहतास 37, सहरसा 13, समस्तीपुर 34, सारण 4, शेखपुरा 13, शिवहर 9, सीतामढी 4, सिवान 90, सुपौल 8, वैशाली 25 आणि , पूर्वी चंपारण मधील 93 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, बिहारमध्ये आतापर्यंत 13 हजार 019 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.