वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात ब्रिग्टन होवे अलबियॉन संघाने अर्सेनेलला 2-1 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे पुढील महिन्यात होणाऱया युरोपियन फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी अर्सेनेलच्या आशेला जबरदस्त तडाखा बसला आहे. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात वेटफोर्डने लिसेस्टर सिटीला 1-1 असे बरोबरीत रोखले.
अर्सेनेल आणि ब्रिग्टन यांच्यातील सामन्यात निकोलास पिपेने उत्तरार्धात बिग्टनचे खाते उघडले. त्यानंतर लेविस डंकने गोल नोंदवून अर्सेनेलला बरोबरी साधून दिली. स्टॉपेज कालावधीतील फ्रान्सच्या मॉप्ंाsने ब्रिग्टनचा दुसरा निर्णायक गोल नोंदवून अर्सेनेलचे आव्हान संपुष्टात आणले. या पराभवामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात अर्सेनेल 30 सामन्यांतून 40 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. या स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड 46 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या या स्पर्धेतील सामन्यात मँचेस्टर सिटीने अर्सेनेलचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. ब्रिग्टनचा संघ 32 गुणांसह 15 व्या स्थानावर आहे.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अन्य एका सामन्यात वेटफोर्डने लिसेस्टर सिटीला 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात बेन चिलवेलने लिसेस्टर सिटीचे खाते उघडले. त्यानंतर पेग डॉसनने वेटफोर्डला बरोबरी साधून दिली. या सामन्यात लिसेस्टर सिटीने महत्त्वाचा एक गुण मिळविण्याची संधी गमावली.