सोमवारी 16 नव्या रुग्णांची भर
प्रतिनिधी बेळगाव
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे जिह्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 393 वर पोहोचली असून मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर तरुणीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
अथणी व गोकाक तालुक्मयातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीन किंवा जिल्हा बुलेटीनमध्ये माहिती देण्यात आली नाही. वरिष्ट अधिकाऱयांनी मात्र दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जिह्यातील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी केवळ आठवडय़ाभरात 7 जण दगावले आहेत. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.