प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील शिवखोल परिसरात आज एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती दिल्ली येथून आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली. हा रुग्ण दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज गेला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने शिवखोल पासूनच्या परिसर सील करण्यात सुरुवात केली. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून परिसरात निर्जंतूकीकरण करण्यात आले. नागरिकांनी घरातच रहावे घरा बाहेर पडू नये असा सक्त सूचना प्रशासनकडून देण्यात येत आहेत.