वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
साऊथ कॅरोलिनामधील चार्ल्सटन येथे आयोजित केलेल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची महिला टेनिसपटू मॅडिसन किजने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम विजेती सोफिया केनिनला पराभवाचा धक्का दिला.
शनिवारी झालेल्या सामन्यात किजने केनिनचा 6-3, 5-7, 10-2 असा पराभव केला. तत्पूर्वी किजने गेल्या गुरूवारच्या सामन्यात आपल्याच देशाच्या कॅरोलिनीन डुलेडीचा 6-1, 6-7 (6-8), 10-8 असा पराभव केला होता. 2019 साली किजने डब्ल्यूटीए टूरवरील चार्लस्टन महिलांची टेनिस स्पर्धा जिंकली होती. यावेळी या स्पर्धेत 16 टेनिसपटूंचा सहभाग आहे. सदर स्पर्धेतील झालेल्या अन्य सामन्यात अमेरिकेच्या ब्रॅडीने आपल्या देशाच्या स्टिफेन्सवर 6-3, 7-6 (7-4) अशी मात केली. पावसाचा अडथळा आल्याने बरेच सामने खेळविले गेले नाहीत.