‘रत्नदुर्ग’च्या पायथ्याशी आढळलेला युवतीचा मृतदेह : घातपाताची शक्यता मावळली
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नदुर्गच्या पायथ्याशी मृतावस्थेत सापडलेल्या दिक्षा इंगवले हिच्या मृत्यूपूर्वीची इन्स्टाग्राम पोस्ट समोर आली आह़े यामध्ये दिक्षा आपण आई-वडिलांवर खूप प्रेम करत असल्याचे सांगत़े तसेच आयुष्य संपण्याची वेळ आली आह़े सर्वांना माझा ‘शेवटचा गुड बाय’ असा संदेश दिक्षा हिने आत्महत्येच्या एक दिवस आधी पोस्ट केल्याचे पुढे आल्याने दिक्षाने आत्महत्याच केल्याचे जवळपास निश्चित झाले आह़े
शहर परिसरातील एका महाविद्यालयात शिकणाऱया दिक्षा मोहन इंगवले (21, हिंदू कॉलनी, रत्नागिरी) ही युवती रत्नदुर्गच्या पायथ्याशी मृत अवस्थेत आढळली होत़ी या घटनेवरून अनेक कयास लावण्यात येत होत़े दिक्षा हिने आत्महत्या केली की हा घातपात आहे, या बाबत निष्कर्षापर्यंत जाण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत होत़ा दरम्यान मृत्यूच्या आदल्या दिवशी 28 फेबुवारी रोजी दिक्षा हिने केलेली इन्स्टाग्राम पोस्ट समोर आली आह़े त्यामुळे दिक्षा हिचा घातपात झाल्याची शंका जवळपास मावळली आह़े
दिक्षा ही मूळची महाड तालुक्यातील असून तिचे आई-वडील महाड येथेच नोकरीला आहेत़ ती आपल्या आजीकडे वास्तव्यासाठी आली व येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होत़ी अभ्यासामध्ये हुशार असलेली दिक्षा बीएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत होत़ी तिने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले, या बाबत अद्याप खुलासा झालेला नाह़ी मात्र इन्स्टाग्राम पोस्टवरून दिक्षा कोणत्या तरी दडपणाखाली असल्याचे जाणवत आह़े
दिक्षाची शेवटची पोस्ट
‘मला कितीही हिणवले गेले अथवा काहीही किंमत नसल्यासारखे वागवले गेले तरी आई-वडिलांवरील माझे प्रेम चिरंतन आह़े मात्र जीवनात अशी एक वेळ येते की स्वतःचे आयुष्य संपवावे लागते…. सर्वांना खूप प्रेम … शेवटचा गुड बाय’