मुर्तजा बरफवाला यांची माहिती : बेळगावात मधविक्रीचा शुभारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
हिमालयामधील फुलांवरील परागकण व मध वेचणाऱया मधमाशांपासून ‘डेलीझिओ’ हा मध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तो अत्यंत शुद्ध असून आरोग्यासाठी हितकारक आहे, अशी माहिती डेलीझिओचे वितरक मुर्तजा बरफवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगावमध्ये सोमवारी या मधविक्रीचा शुभारंभ करण्यात आला. मुर्तजा म्हणाले, हा मध चवीला उत्तम आहे. मुख्य म्हणजे याच्या सेवनाने प्रतिकारशक्ती निर्माण होते. वेगवेगळय़ा प्रकारचे इन्फेक्शन कमी होऊन उत्तम झोप लागते.
मधाची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन करण्यात आले असून सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतरच हा मध बाजारात आणला आहे. यावेळी ज्ये÷ डॉ. सुरेश रानडे यांनी आयुर्वेदामध्ये मध महत्त्वाचा असून मधाच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. डेलीझिओ मधामध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ वापरले नसल्याने तो पौष्टिक आहे, असे सांगितले.
मधाच्या सेवनामुळे डोळय़ांची जळजळ कमी होते. झोप चांगली लागते, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी अजीज बरफवाला व मुफद्दल बरफवाला उपस्थित होते.